'...पण भुंग्याने कमळातच रहायचे असते', भाजपच्या राष्ट्रीय चिटणीसपदी निवड झाल्यानंतर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 11 October 2020

राष्ट्रीय चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल उत्तर मुंबई भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही. तेव्हा राज ठाकरे, अजित पवार यांचे दुरध्वनी आले पण कुणीही पक्ष सोडून या, असे विचारले नाही. कारण मी भाजपचाच आहे हे त्यांना माहित होते, असे उद्गार विनोद तावडे यांनी काढले आहेत. राष्ट्रीय चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल उत्तर मुंबई भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या वेळी उपस्थित होते. 

म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांसाठी लवकरच सोडत; सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे

कमळात भुंगा असतो याचे स्मरणही त्यांनी करून दिले. विरोधी पक्षनेता झालो त्या वेळी उत्तर मुंबईने माझा सत्कार केला नव्हता, याकडे लक्ष वेधून दरेकर यांनी तावडेंचे कौतुक केले. त्यावर तावडे यांनी मंत्री झाल्यावर सत्कार करायचा आहे. म्हणून केला नसेल असे सांगत कोटी केली. भाजपमध्ये जुने नवे काही नसते असेही ते म्हणाले. सुनील राणे, अतुल भातकळकर, मनीषा चौधरी हे या भागातील आमदारही या वेळी उपस्थित होते. 

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinod Tawdes reaction after being elected as BJPs national secretary