esakal | विरारमध्ये तरुणाचा धारदार हत्याराने खून | Virar murder crime
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

विरारमध्ये तरुणाचा धारदार हत्याराने खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : विरारमध्ये (virar) चोरट्याने एका ३० वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याची हत्या (murder) केली. हत्या झालेल्या व्यक्तीची चोरटा पर्स हिसकावून पळत असताना त्याचा पाठलाग करून पकडले असता चोरट्याने वार (thief attack) केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी चोरट्याला पकडले. याबाबत विरार पोलीस ठाण्यात (virar police station) जबरी चोरी, हत्याप्रकरणी गुन्हा दाखल (police FIR) केला आहे. हत्या करणारा चोरटा सराईत असून, त्याच्यावर रेल्वेत चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. प्रदीप राजेश्याम त्रिपाठी (रा. विरार-कोपरी) असे चोरट्याचे नाव आहे.

हेही वाचा: वाडा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

हर्षल वैद्य (वय ३०, रा. विलेपार्ले) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नवरात्रीनिमित्त ते विरार ग्लोबल सिटी येथे नातेवाइकांकडे आले असता ही घटना घडली. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ते परत जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेले असता एका सराईत चोरट्याने त्यांची पर्स हिसकावून पळ काढला होता. त्यांनी त्याचा पाठलाग करून विरार पश्चिम स्थानकाजवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडले. चोरटा आणि वैद्य यांच्यात झटापट झाली.

याच झटापटीत चोरट्याने जवळील धारदार हत्याराने वैद्य यांच्या छातीवर वार केले. आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी जखमीला तत्काळ बाजूच्या रुग्णालयात दाखल केले. चोरट्यालाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमीवर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करीत असल्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल चौगुले यांनी सांगितले.

loading image
go to top