FIR Filed Against Railway Administration for Environmental Damage
विरार : प्रहार जनशक्ती पक्षाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याअंती ई.एम.यु कारशेड, विरार येथील शेकडो वृक्ष नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या भारतीय रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसई विरार मध्ये रेल्वे प्रशासना विरोधात पर्यावरणा च्या ऱ्हासा विरोधात दाखल केलेला हा पहिलाच गुन्हा आहे. भारतीय रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची आणि अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी न घेता शुक्रवार ७ मार्च २०२५ रोजी ई.एम.यु कारशेड, विरार येथे जाणीवपूर्वक लावलेल्या आगीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाडे नष्ट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास झाला होता.