esakal | विरार: जीवदानी देवीच्या भाविकांसाठी लवकरच सुरु होणार फणीक्युलर ट्रेन
sakal

बोलून बातमी शोधा

विरार: जीवदानी देवीच्या भाविकांसाठी लवकरच सुरु होणार फणीक्युलर ट्रेन

 विरारच्या जीवदानी देवीच्या डोंगरावर जाण्यासाठी भाविक भक्तांच्या सोयीसाठी लवकरच फणीक्युलर ट्रेन सुरू होत आहे. या ट्रेनचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जीवदानीच्या डोंगरावर सुरू होणारी क्रॉसिंग लूकवाली भारतातील पहिलीच ट्रेन असल्याचा दावा जीवदानी देवी देवस्थानचे संचालक राजीव पाटील यांनी केला आहे.

विरार: जीवदानी देवीच्या भाविकांसाठी लवकरच सुरु होणार फणीक्युलर ट्रेन

sakal_logo
By
विजय गायकवाड

मुंबईः  विरारच्या जीवदानी देवीच्या डोंगरावर जाण्यासाठी भाविक भक्तांच्या सोयीसाठी लवकरच फणीक्युलर ट्रेन सुरू होत आहे. या ट्रेनचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जीवदानीच्या डोंगरावर सुरू होणारी क्रॉसिंग लूकवाली भारतातील पहिलीच ट्रेन असल्याचा दावा जीवदानी देवी देवस्थानचे संचालक राजीव पाटील यांनी केला आहे.

मुंबईच्या वेशीवरच असणाऱ्या विरार पूर्वेला जीवदानीचा डोंगर आहे. हा डोंगर जमिनीपासून 900 फूट उंच असून, 800 फूट उंचीवर जीवदानी मातेचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिरावर जाण्यासाठी 1400 शिड्या पार करत जाऊन जीवदानी मातेचे दर्शन घ्यावे लागते.  मुंबई, पालघर, ठाण्यासह महाराष्ट्र, गुजरात परिसरातील लाखो भाविक भक्तांचे जीवदानी माता हे श्रद्धास्थान आहे. 

दसरा, दिवाळीमध्ये 4 ते 5 लाख भाविक जीवदानीच्या दर्शनासाठी येतात. आता याच भाविकांच्या सोयीसाठी फणीक्युलर ट्रेनची व्यवस्था केली आहे. सध्या ही ट्रेन ट्रायल बेसवर सुरू आहे. पण सर्व परवानगी घेऊन ती भाविकांसाठी सुरू होणार आहे.

अधिक वाचा-  आयडॉलच्या एमसीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज सुरू, 25 नोव्हेंबरला ऑनलाइन परीक्षा

जीवदानी च्या डोंगरावर सुरू होणारी फणीक्युलर ट्रेन ही  380 मीटर लांबीची आहे. जवळपास 600 फूट उंचीची अंतर ही ट्रेन सध्या 7 मिनिटात कव्हर करत आहे. या ट्रेन मध्ये एकाचवेळी एका डब्ब्यात 104 भाविक डोंगारावर जाऊ शकतात. तर 104 भाविक डोंगरावरून खाली येऊ शकतात. एका तासाला ही ट्रेन 12 ट्रिप करणार आहे. एकाच ट्रॅक वर 2 डब्बे चालणार असून मध्यभागी याला क्रॉस लूकिंग दिला आहे. ट्रेनच्या दोन्ही बाजूला शिडी दिल्या आहेत. कोणतीही अपघातात्मक घटना घडली तर यात कोणतीही रिस्क भाविकांना नाही. कारण ही ट्रेन तात्काळ हायड्रॉलिक पद्धतीने ब्रेक होऊन जाग्यावर थांबते. क्रॉसिंग लूक वाली भारतातील ही पहिलीच ट्रेन असून, या सर्व प्रोजेक्ट ला 32 ते 35 कोटींचा खर्च आला  आहे. (R i t e s) रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिकल सर्व्हिसेस कंपनीकडून  सर्टीफाय असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले आहे.  जीवदानी मंदिर देवस्थानचे संचालक राजीव पाटील यांनी सांगितले आहे. 

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Virar Funicular train for devotees of Jeevdani Devi will start soon