esakal | 'नॅशनल न्यूज नाही', टोपेंच्या विधानावर फडणवीस म्हणतात...

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

'नॅशनल न्यूज नाही', टोपेंच्या विधानावर फडणवीस म्हणतात...

sakal_logo
By
दीनानाथ परब

वसई: "विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील अग्नितांडव ही दुर्देवी आणि धक्कादायक घटना आहे. सातत्याने होणाऱ्या या घटना आणि कोविडचं भय लोकांच्या मनात आहे. हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या या घटनांमुळे लोकांच्या भीतीमध्ये भर पडतेय. प्रत्येक घटनेनंतर मुख्यमंत्री, प्रशासन चौकशी करु असं सांगतात. पण फायर ऑडिट होताना दिसत नाही" असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"कोविड काळात हॉस्पिटल्सवर ताण आहे. आपल्याला काही ना काही व्यवस्था उभी केली पाहिजे. अशा घटना कशा टाळता येतील, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भंडारा, नाशिक, ईशान्य मुंबईत रुग्णालयांमध्ये जे घडलं त्या भयानक प्रकारच्या घटना आहेत. विरार हॉस्पिटल अग्नि दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत" असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा: Virar Hospital Fire: राज ठाकरे म्हणाले, ''ही घटना दुर्देवी आणि क्लेशदायक''

"आता बचावलेल्या अन्य रुग्णांची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे. या सगळ्या घटनांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आग लागण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रयत्न करा. अशा अग्निदुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. नाशिक, नागपूर, भंडारा, विरार, मुंबईमधील घटनानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतो. पण अशा घटना टाळण्यासाठी जे केलं पाहिजे ते करत नाही. अशा घटनांमुळे कोविड विरोधातील लढाई अधिक कठिण बनते" असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: राजेश टोपेंना घरी बसवा..!! भाजप नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

राजेश टोपे यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, "हा राष्ट्रीय मुद्दा नाही असं राजेश टोपे यांनी म्हणणं म्हणजे ही असंवेदनशीलता आहे. ते कुठल्या मानसिकतेत म्हणाले हे मला माहित नाही. अशी प्रतिक्रिया देण अयोग्य आहे."