
विरार : मराठी शाळांची त्यातल्या त्यात जिल्हापरिषदेच्या शाळांची स्थिती गंभीर आहे. त्या शाळेची अवस्थाही बरोबर नसते, त्याचप्रमाणे आता सर्वसामान्य लोक आपल्या पाल्यांना हायटेक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवत असल्याने जिल्हापरिषदेच्या शाळांची पटसंख्याही रोडावत आहे. अशातच वसई तालुक्यातील जूचंद्र गावातील गावकऱ्यांनी शाळा सुधार समितीच्या माध्यमातून शाळा हायटेक केली आहे.