Virar Protest : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे संतप्त नागरिकांचे अभिनव आंदोलन

The Unbearable State of NH-48: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) वसई-नायगाव-चिंचोटी परिसरातील नादुरुस्त रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि धुळीच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी समस्या न सुटल्याने पंतप्रधानांकडे आत्महत्येसाठी परवानगी मागणारे पत्र लिहून अभिनव आंदोलन केले.
Virar Residents Write to PM Modi Demanding 'Suicide Permission' Over Unending Traffic and Dust Issues on NH-48.

Virar Residents Write to PM Modi Demanding 'Suicide Permission' Over Unending Traffic and Dust Issues on NH-48.

Sakal

Updated on

विरार : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) वसई–नायगाव–चिंचोटी परिसरातील नादुरुस्त रस्ते, खड्डे आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या या त्रासाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागांना वारंवार निवेदनं दिली गेली, तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.या महामार्गाचे जवळ असलेल्या गावातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच महामार्गावरून उडणाऱ्या धुळी मुले येथील नागरिकांना श्वसनाच्या त्रासही सामोरे जावे लागर्त आहे. त्यामुळे आता महामार्ग लगतच्या गावातील नागरिकांनी हि समस्या सुटत नसल्याने आता आत्महत्येसाठी पंतप्रधानांकडे परवानगी मागणीसाठी पत्रे लिहून आज एक अभिनव आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com