bahujan vikas aghadi and bjp
sakal
विरार - महानगरपालिकेच्या सत्तेसाठी बहुजन विकास आघाडीतून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला असून, बविआमधून आलेल्यांना गुंडांना तिकीट देऊ नका, असे पत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.