Mumbai: विरारचे पापडखिंड धरण ओव्हरफ्लो ; महापौरांनी केली पाहणी ,बुलेट ट्रेन रस्त्यामुळे धरणाला धोका
Papadkhind Dam Overflows After Heavy Rain: महापौर अजीव पाटील यांनी धरणाची पाहणी करत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी परवानगीशिवाय बांधलेल्या रस्त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.
विरार: सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विरार येथील पापडखिंड धरण ओव्हरफ्लो (तुडुंब) झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वसई-विरार शहराचे महापौर अजीव पाटील यांनी आज (५ जुलै) सकाळी धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली.