esakal | विरार: मेडिकल दुकानात चोरी; मालकाला ठेवले फक्त दोन गुलाबजाम
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabjamun robbery

विरार: मेडिकल दुकानात चोरी; मालकाला ठेवले फक्त दोन गुलाबजाम

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार: चोर (thief) कधी कसली चोरी (robbery) करतील याचा नेम नाही . घरातील सोने नाणे , पैसे, गाडी चोरण्याच्या घटना आपण नेमहीच ऐकत आलो आहोत, परंतु एका चोराने मेडिकलच्या दुकानात (Medical shop) चोरी केली ती पण चक्क गुलाब जामची पण चोर चांगला होता त्याने स्वतः आठ गुलाबजाम खाऊन दुकान मालकाला (shop owner) दोन गुलाबजाम ठेऊन आपण इमानदार असल्याचे दाखवून दिले आहे.

हेही वाचा: सामान्यांच्या गळ्यात कर्जे, बँकांपासून सावध रहा; कर्मचारी संघटनेचे आवाहन

विरारमध्ये एका भूरट्या चोराने चोरी करताना दुकानातील पॅकबंद गुलाबजामवर ताव मारल्याची घटना उघडकीस आली आहे. विरार पूर्वेच्या कुंभारपाडा परिसरात असलेल्या चामुंडा मेडिकल शॉप मध्ये काल रात्री चोरट्यांनी हाथ साफ केला. खिडकीवाटे आलेल्या या चोरट्यांनी मेडिकल दुकानाच्या गल्ल्यातील पंचावन्न हजार रुपयांची रोकड लंपास केली मात्र चोरट्यांनी जाता जाता दुकानात विकण्यासाठी असलेले हलदीराम कंपनीचे गुलाबजाम फस्त करून पोबारा केला . आज सकाळी ही घटना दुकानमालक दुकानात आल्यानंतर उघडकीस आली.चोरट्यांनी चोरी करताना गुलाबजाम खाऊन आपले तोंड गोड केले मात्र दुकानात चोरी झाल्याने मालकाचे तोंड मात्र कडू केले.चोराने चोरी केली आणि गुलाबजाम जरी झाले असले तरी त्याने चोरी झाल्यावर मालकाचे तोंड कडू होणार हे ओळखून मालका साठी २ गुलाबजाम मात्र ठेवल्याचीच चर्चा चोरी पेक्षा जास होताना दिसत आहे.

loading image
go to top