Video: विरारमध्ये हळदी समारंभात तुफान राडा

दोन गटांमध्ये जोरदार भांडण झालं आणि व्हिडीओ झाला व्हायरल
Video: विरारमध्ये हळदी समारंभात तुफान राडा

विरार (मुंबई): अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार पूर्व भागातील सकवार गावांत ऐन कोरोनाचे वाढते संक्रमण असताना हळदीच्या समारंभात भरपूर गर्दी जमली. या कार्यक्रमासाठी शनिवारी संध्याकाळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांमध्ये आपसांत तुफान मारामारी झाल्याची घटना समोर आली. या हळदीच्या कार्यक्रमात दोन ते तीन गटात कशी मारामारी झाली याचा संपूर्ण Video आता सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. एका बाजूला नालासोपाऱ्यात पालिका प्रशासन लग्न समारंभात नियम तोडले म्हणून ५० हजाराचा दंड वसूल करत आहे. तर दुसरीकडे मात्र ग्रामपंचायत हद्दीत मात्र जिल्हा प्रशासनाचे अजिबात लक्ष नसल्याचे चित्र आहे. (Virar Viral Video Marriage Haldi ceremony big fight)

Video: विरारमध्ये हळदी समारंभात तुफान राडा
मुंबई: तरूणाला विनामास्क पकडलं अन् पोलिसांना बसला धक्का

विरार पूर्व सकवार गावांत तांबडी कुटुंबातील सुनील नावाच्या व्यक्तीचे लग्न होते. आज त्याच्या हळदीसाठी पाच-पंचवीस नाही तर दोनशेहून अधिक गावकऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या ठिकाणी सर्वत्र कोविड नियमांचे कुठेही पालन झालं नाही. याउलट जमलेल्या शेकडोंमध्ये काही शुल्लक कारणांवरुन मोठा वाद झाला आणि त्यात दोन ते तीन गटात मारामारी झाली. मारामारी इतकी टोकाला गेली की त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्याही फेकून मारल्या.

Video: विरारमध्ये हळदी समारंभात तुफान राडा
विरारमधल्या गायब झालेल्या आजोबांचं अखेर गूढ उकललं...

दरम्यान, शासनाच्या कोविड नियमानुसार लग्न समारंभासाठी केवळ 25 जणांची उपस्थिती व लग्न सोहळा दोन तासांत आटोपणं बंधनकारक आहे. असे असताना इथे गावांत शेकडो ग्रामस्थ जमेलच कसे? असा प्रश्न आता पोलीस व जिल्हा प्रशासनाला पडला आहे. तसेच बाजूलाच राहणाऱ्या सरपंच व गावच्या पोलीस पाटील यांनी यात हस्तक्षेप करून हे बंद का केले नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे. आता या प्रकरणात पोलीस आणि तालुका प्रशासन काय कारवाई करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तहसीलदार म्हणतात...

काल उशिरा घडलेला ह्या प्रकारची माहिती मिळाली असून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे चौकशी नंतर सम्बधितावर कारवाई करणार . कोरोनाचे नियम तोडून कोरोना पसरविण्यास कारणीभूत अस्लेल्यावर कठोर कारवाई करणार.

- उज्ज्वला भगत, तहसीलदार, वसई

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com