Dasara Melava : "दोन्ही गट समोरासमोर आले तर..."; विश्वास नांगरे पाटलांची माहिती

पोलीस आपलं काम चोख करतायत, जनतेनेही काळजी घ्यावी, असंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले आहेत.
Dasara Melava Police Security
Dasara Melava Police SecuritySakal

शिवसेनेचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित दसरा मेळावा उद्या पार पडणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर आपलं भाषण करतील. यासाठी दोन्ही गट मोठं शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असून त्यामुळे दोन्ही गटांमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पोलीस मात्र या सगळ्यासाठी सज्ज आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दसरा मेळाव्याच्या दृष्टीने केलेल्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली आहे. नांगरे पाटील म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे यासाठी आम्ही विशेष काळजी घेतोय. दोन्ही मैदानात मोठा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. क्विक रिस्पॉन्स टीम, दंगल नियंत्रण पथक आणि इतर यंत्रणाही आम्ही लावलेली आहे.

Dasara Melava Police Security
Dasara Melava : एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत! एकनाथ शिंदे जिंदाबाद - अमृता फडणवीस

नांगरे पाटील पुढे म्हणाले, "बंदोबस्ताची विभागणी आम्ही खूप व्यवस्थितरीत्या लावलेली आहे. दसऱ्याच्या उत्सव आणि मेळावे या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त लावलेला आहे. स्वयंसेवक आणि इतर लोकांची आम्ही मदत घेत आहोत. ट्रॅफिकची समस्या उद्भवू नये यासाठी आम्ही विशेष नियोजन केलं आहे. तसं दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर जिथे येऊ शकतात, अशी ठिकाणं हेरून आम्ही विशेष काळजी घेत आहोत.

Dasara Melava Police Security
Eknath Shinde : महिला कंडक्टरचं निलंबन आणि CM शिंदेंचा रील बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांबद्दल बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले, "महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही विशेष काळजी घेतोय. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही महिलांसाठी वेगळे विभाग बनवले आहेत. काही ठिकाणी महिला आणि पुरुष असे एकत्रित सेक्टर बनवलेत पण त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही तयारी केलेली आहे. लोकांना आवाहन आहे की गर्दी होणारच आहे. मात्र तुम्ही स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com