Eknath Shinde : महिला कंडक्टरचं निलंबन आणि CM शिंदेंचा रील बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

काहींनी एकनाथ शिंदेंना कॅमेराजीवी म्हणून संबोधलं आहे.
EKnath Shinde Viral Video
EKnath Shinde Viral VideoSakal

सोशल मीडियावर रील्स बनवत असल्याने एका महिला कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे. याच प्रकरणाच्या संदर्भाने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते रील बनवतायत असा दावा केला जात आहे.

EKnath Shinde Viral Video
Dasara Melava : एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत! एकनाथ शिंदे जिंदाबाद - अमृता फडणवीस

या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे एका मोठ्या मैदानावरच्या स्टेजवर उभे आहेत. त्यांच्या अवतीभवती असणारे लोक त्यांचा व्हिडीओ बनवत आहेत. ते शिंदेंना दिशा देत आहेत, कसं कुठे उभं राहायचं याबद्दल सल्ला देत आहेत. त्याप्रमाणे मुख्यमंत्री पुढे मागे चालत आहेत. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे.

काहींनी त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केली आहे. तसंच त्यांना कॅमेराजीवी म्हणून संबोधलं आहे. तर काहींनी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिल्स बनवणाऱ्या एसटी कंडक्टरला जर नोकरीवरुन काढून टाकलं जात असेल तर अशी रील बनवणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर काय कारवाई व्हायला पाहिजे का?, असंही एका युजरने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com