वसई किल्ल्यास पोलिस अधिकाऱ्यांची भेट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

विरार : वसई किल्ला अभ्यास भटकंतीसाठी तसेच किल्ला दर्शनासाठी रविवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किल्ल्याला भेट दिली. या वेळी इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी पोलिस अधिकाऱ्यांना किल्ल्याचा इतिहास, तसेच दुर्ग संवर्धनाबाबत राबविण्यात येणाऱ्या श्रमदान मोहिमेची सविस्तर माहिती दिली. 

विरार : वसई किल्ला अभ्यास भटकंतीसाठी तसेच किल्ला दर्शनासाठी रविवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किल्ल्याला भेट दिली. या वेळी इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी पोलिस अधिकाऱ्यांना किल्ल्याचा इतिहास, तसेच दुर्ग संवर्धनाबाबत राबविण्यात येणाऱ्या श्रमदान मोहिमेची सविस्तर माहिती दिली. 

वसई किल्ल्यास पोलिस अधिकारी सुरेशकुमार मेकाला (आयपीएस), प्रवीण पवार (आयपीएस), अनिल कुंभारे (आयपीएस), डॉ. प्रियांका नारनवरे (आयपीएस), पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, पोलिस उपायुक्त अंबुरे, पोलिस निरीक्षक अनंत पराड, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रम पन्हाळकर आणि अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली. अभ्यास भटकंतीसाठी किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांना बोलविण्यात आलेले होते.

ही बातमी वाचा ः घरात घुसून बंदूकीचा धाक दाखवत घातला दरोडा

या वेळी डॉ. राऊत यांनी पोलिस अधिकाऱ्यांना नरवीर चिमाजी अप्पांची वसई मोहिमेतील कामगिरी, पोर्तुगीजकालीन वसई किल्ल्याचे आराखडे, 300 वर्षांपूर्वी वसई किल्ल्याचे ब्रिटिशकालीन छायाचित्रे, जंजिरे वसई किल्ल्याच्या संवर्धनासाठी करण्यात येणारे नियमित श्रमदान, वसई किल्ल्यातील नरवीर चिमाजी अप्पा स्मारक, परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष, किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन चर्च इत्यादी विषयावर सविस्तर माहिती दिली. 

संवर्धनाबाबत पोलिसांच्या सूचना 
या वेळी वसई किल्ल्याच्या पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांना किल्ल्याची तटबंदी, तसेच संवर्धनाबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. तसेच स्थानिक किल्ले वसई मोहीम परिवार दुर्गमित्र आणि आपल्या विभागातील प्रतिनिधी यांची संयुक्त श्रमदान मोहीम आयोजित करून तटबंदी संवर्धनासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना केली. डॉ. राऊत यांनी अधिकारीवर्गास वसई किल्ल्यातील कॅप्टन हाऊस व भुयारी मार्ग याबाबत माहिती दिली. तसेच तेथील धोकादायक परिस्थितीबाबत कल्पना दिली. या वेळी ठाणे बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना डॉ. राऊत यांनी जंजिरे वसई किल्ला अभ्यास सफर घडवली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Visit of police officers to Vasai Fort