padma award to bhiklya ladkya dhinda
sakal
मोखाडा - पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीचा जिवंत श्वास मानल्या जाणाऱ्या तारपा वादनाला अखेर राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध तारपा वादक, अनेक पुरस्कारांनी सन्मानित भिकल्या लाडक्या धिंडा यांना अतिशय प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार जाहीर झाल्याने पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ही घोषणा म्हणजे केवळ एका कलाकाराचा नव्हे, तर पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या आदिवासी लोककलेचा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Tarpa instrument with Tribal Artist Bhiklya Ladkya Dhinda
sakal