
कार्यकर्त्यांची चलबिचल; राज ठाकरे थोड्याच वेळात स्पष्ट करणार भूमिका
मुंबई : औरंगाबाद येथील सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मशिदींवरील भोंगे काढण्याचा मनसेचा अल्टिमेटमही आज समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदर यांनी दिली आहे. (volatility of the workers Raj Thackeray will explain the role shortly)
किल्लेदार म्हणाले, गुन्हा औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानं पोलीस राज ठाकरेंना अटक करु शकत नाहीत. पण स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर औरंगाबाद पोलीस इथं दाखल होऊ शकतात. त्यामुळं आज राज ठाकरेंना आज अटक होईल असं वाटत नाही. पुढील अर्धा तासात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील.
हेही वाचा: राज ठाकरेंच्या घराबाहेर पोलीस अधिकारी दाखल; कार्यकर्त्यांची गर्दी वाढली
मोठ्या प्रमाणावर मनसैनिकांची गर्दी राज ठाकरे यांच्या घराबाहेर झाल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला आहे. यावेळी मनसेच्या एका कार्यकर्त्यानं म्हटलं की, "आम्हाला असं कळलं की राज ठाकरेंना अटक होण्याची शक्यता आहे, त्यामुळं आम्ही इथं आलो आहोत. पण जर राज ठाकरेंना अटक झाली तर याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील. हा विषय आता केवळ मनसेपुरता राहिलेला नाही, तर संपूर्ण हिंदुत्वाचा झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही पोलिसांना राज ठाकरेंना अटक करुन देणार नाही"
Web Title: Volatility Of The Workers Raj Thackeray Will Explain The Role Shortly
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..