राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलीस अधिकारी दाखल; कार्यकर्त्यांची गर्दी वाढली | Raj Thackeray News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray News Updates
राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलीस अधिकारी दाखल; कार्यकर्त्यांची गर्दी वाढली

राज ठाकरेंच्या घराबाहेर पोलीस अधिकारी दाखल; कार्यकर्त्यांची गर्दी वाढली

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादरचं निवासस्थान 'शिवतीर्थ' बाहेर पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर इथं पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. (Police officer gather outside Raj Thackeray house the crowd of MNS workers increased)

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोलीस जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानंतर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी या कार्यकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान, राज ठाकरे यांना अटकेबाबत चर्चा सुरु झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणावर मनसैनिकांची गर्दी राज ठाकरे यांच्या घराबाहेर झाल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला आहे. यावेळी मनसेच्या एका कार्यकर्त्यानं म्हटलं, "आम्हाला असं कळलं की राज ठाकरेंना अटक होण्याची शक्यता आहे, त्यामुळं आम्ही इथं आलो आहोत. पण जर राज ठाकरेंना अटक झाली तर याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील. हा विषय आता केवळ मनसेपुरता राहिलेला नाही, तर संपूर्ण हिंदुत्वाचा झाला आहे" कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना राज ठाकरेंना अटक करुन देणार नाही, असा पवित्राही मनसेच्या कर्यकर्त्यांनी घेतला आहे.

Web Title: Police Officer Gather Outside Raj Thackeray House The Crowd Of Mns Workers Increased

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top