VVMC Garbage Tender : तांत्रिक कारणामुळे घनकचरा निविदा रद्द; ठेकेदार न्यायालयात, १८ जूनला सुनावणी

High Court Case : वसई-विरार महापालिकेच्या घनकचरा निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप, तांत्रिक कारणावरून रद्द झालेली निविदा, आणि न्यायालयीन लढाईमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Vasai-Virar City Municipal Corporation
Vasai-Virar City Municipal CorporationSakal
Updated on

विरार : वसई विरार महापालिकेत प्रथमच निघालेली निविदा वाटाघाटी नंतर तांत्रिक कारण देत पालिकेने रद्द केल्याच्या विरोधात ठेकेदार न्यायालयात गेले असून त्याची १८ जूनला सुनावणी होणार आहे. घनकचरा प्रकल्पाची त्रैवार्षिक निविदा रद्द केल्याने वाद निर्माण झाला आहे. पहिल्या निविदा प्रक्रियेतील पात्र ठेकेदारांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे पालिकेने नवीन निविदा प्रकिया राबवली आहे.त्यामुळे घनकचरा निविदा कायद्याच्या कचाट्यात सापडणार असल्याचे बोलले जात आहे.

वसई विरारच्या कचऱ्याचा प्रश्न चांगलाच गाजत असताना आता पाळीयुक्त प्रशासनाच्या वेगळ्या भूमिकेने पुन्हा एकदा कचरा पेट घेणार असल्याचे दिसत आहे. घनकचरा विभागातर्फे शहारतील विविध प्रकारच्या साफसफाईसाठी त्रैवार्षिक ठेका काढला जातो त्या मध्ये दैनंदिन सफाई, चैंबर सफाई करणे, घरोघरी जाऊन कचरा उचलणे आणि तो कचराभूमीत नेणे आदी कामांचा समावेश आहे. पालिकेने ऑक्टोबर २०२४ मध्ये २०२५-२६, २०२६-२७ आणि २०२७-२८ अशा एकूण ३ वर्षांसाठी निविदा प्रसिध्द केली होती.

त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तांत्रिक छाननीत पात्र ठरले होते. त्यांनी इसारा रक्कम देखील भरली होती. मात्र या निविदेच्या रकमेबाबत वाटाघाटी करण्यासाठी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सुचवले होते. त्यासाठी मेसर्स टंडन समितीकडे वाटाघाटीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. पात्र अभिकर्त्यांनी सद्यस्थितीत करत असलेल्या कामाच्या मोबदल्याप्रमाणे म्हणजे काम कऱण्याची तयारी दर्शवली आणि वार्षिक १० टक्के वाढ देण्याची विनंती केली होती. मात्र तरी देखील तांत्रिक कारण देत पालिकेने ही निविदा रद्द केली.

निविदा रकमेबाबत वाटाघाटी सुरू असताना पालिकेने तांत्रिक कारण देत निविदा रद्द केली आहे. त्यामुळे पात्र असलेल्या ८ ठेकदारांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन याचिका दाखल केली आहे. पालिकेने निविदा रद्द केल्याने आमचा नैसर्गिक हक्कभंग झाला असून नवीन निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या याचिकेसंदर्भातील पहिली सुनावणी ९ जून रोजी झाली. न्यायालयाने निविदेला स्थगिती दिली नाही. मात्र पहिल्या निविदेबाबत पुढील सुनावणी १८ जून रोजी होणार आहे.

निविदेला स्थगिती नसल्याने पालिकेने दुसरी निविदा प्रसिध्द केली आहे. त्यामुळे न्यायालयात याचिका प्रलंबित आणि निविदा प्रक्रिया सुरू अशी विचित्र अवस्था झाली आहे. त्यामुळे जुन्या ठेकेदारांच्या बाजूने निकाल लागला तरी नवीन ठेकेदार दावा करेल आणि पुन्हा निविदा कायद्याच्या कचाट्यात सापडेल. या गोंधळामुळे पुन्हा घनकचरा निविदेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.तांत्रिक कारणामुळे निविदा रद्द करण्यात आली होती. नवीन निविदा प्रक्रियेला स्थगिती नसल्याने ती सुरू आहे, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.पालिकेच्या ह्या कारनाम्या मुले येथील कचरा पेट घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com