esakal | नवी मुंबई : पालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदात
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवी मुंबई : पालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेच्या (Municipal) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दिवाळी जोरात साजरी होणार आहे. कोविड (Covid) काळात कर्मचाऱ्यांनी केलेले काम पाहता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी तब्बल २५ हजार रुपयांचे बोनस (सानुग्रह अनुदान) जाहीर केले आहे. तर करार आणि तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना १९ हजार, आशा वर्कर यांना ९ हजार रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे.

महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. शिक्षक, बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी कर्मचारी यांना २५ हजार सानुग्रह अनुदान दिले जात आहे. किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना १९ हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.

हेही वाचा: धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडेंना NCB मध्ये मुदतवाढ

सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्त्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पद्धतीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे १९ हजार इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील आशा वर्कर यांनाही ९ हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम दिली जाणार आहे. एकूण ४५८२ अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे. कोविड काळात जोखीम पत्करून केलेल्या कामाची पोहोच पावती मिळाल्याचे समाधान इंटक नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी व्यक्त केले.

loading image
go to top