सोमवारी वडाळा आगारात बेस्ट कर्मचारी करणार आंदोलन, जाणून घ्या आंदोलना मागचं कारण

समीर सुर्वे
Saturday, 12 September 2020

बेस्टच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचाा फज्जा उडत असल्याचं चित्र आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १४ तारखेला वडाळा आगारात कामगार निदर्शने करणार आहेत.

मुंबई: बेस्टच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचाा फज्जा उडत असल्याचं चित्र आहे. वरिष्ठच जादा प्रवाशांना बसमध्ये पाठवत आहे.यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १४ तारखेला वडाळा आगारात कामगार निदर्शने करणार आहेत.

मुंबई अनलॉक होताना व्यवहार आता मोठ्या प्रमाणात सुरु होत आहेत. मात्र लोकल सेवा बंद असल्याने नोकरदारांच्या सर्व प्रवासाचा भार बेस्ट बसेसवर आला आहे. मात्र,सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार एका आसनावर एक प्रवासी आणि उभ्याने फक्त 5 प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र,वडाळा डेपोतील वरिष्ठ अधिकारी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासून जादा प्रवासी बसमध्ये घेण्यासाठी वाहक आणि चालकांवर दबाव आणत असल्याचा आरोप बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीने केला.

अधिक वाचाः  आयुर्वेदिक निवासी डॉक्टर 5 महिने वेतनाविना; डॉक्टरांकडून आंदोलनाचा इशारा

तीन महिन्यांच्या कालावधीत बेस्ट प्रवाशांची संख्या अडीच लाखांवरून १५ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे मोठे आव्हान ठरत आहे. अशावेळी बसमध्ये जादा प्रवासी भरण्याचे नियमबाह्य तोंडी आदेश अधिकारी देत आहेत. वडाळा बस आगार येथील अधिकाऱ्यांनी असे आदेश दिल्याचा आरोप बेस्ट कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे. या विरोधात सोमवारी बेस्ट कर्मचारी वडाळा आगारात निदर्शने करणार आहेत.

 हेही वाचाः  भाजप नेते किरीट सोमय्या यांचा राज्य सरकारवर निशाणा, वाचा सविस्तर

कारवाईही होते

प्रशासनाकडून जादा प्रवासी भरण्याचे लेखी आदेश नाहीत.मात्र,काही वरीष्ट तोंडी आदेश देऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाा उडवत आहेत.तसेच हे आदेश न पाळणार्या वाहकांवर दैनंदिन अहवालावर कारवाईचा शेरा दिला जात आहे.

----------------

(संपादनः पूजा विचारे) 

Wadala depot on Monday Best employees will protest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wadala depot on Monday Best employees will protest