अॅमेझॉनसाठी मध्य रेल्वेकडून मालडबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

रेल्वेला 6 लाख 10 हजार रुपयांचा महसूल मिळणार

मुंबई : अॅमेझॉन कंपनीच्या पार्सल वाहतुकीसाठी मध्य रेल्वेने लोकलमधील एक मालडबा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेला 6 लाख 10 हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. तसेच ग्राहकांपर्यंत पार्सल लवकर पोहोचण्यासही मदत होणार आहे.

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा... ► क्लिक करा

ऑनलाईन शॉपिंग कंपनीला त्यांच्या गोदामातून पार्सल रस्ते मार्गाने नेण्यास अधिक खर्च लागतो. त्यासाठी अॅमेझॉन कंपनीने मध्य रेल्वेबरोबर 3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर करार केला आहे. यातून मध्य रेल्वेला 6.10 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. अॅमेझॉनचे भिवंडी येथे मोठे हब असून तेथून मुंबईत सर्वत्र पार्सल पाठवले जाते. या करारानुसार अॅमेझॉनचे पार्सल कल्याण स्थानकात मालडब्यात भरून सीएसएमटी येथे उतरवण्यात येईल. पार्सल याव्यतिरिक्त कोणत्याही स्थानकावर उतरविता येणार नाही. यासह अॅमेझॉनचे मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकावर पिकअप पॉईंट आहेत.

मोठी बातमी "हिंदुत्वाच्या मुद्यावर बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर"

या कराराला मध्य रेल्वेने गुरुवारी मान्यता दिली असून मध्य रेल्वेच्या आठ डब्यांचा वापर अॅमेझॉनन कंपनी करणार आहे. एक टन पार्सलसाठी मध्य रेल्वे प्रत्येकी 848 रुपये आकारणार आहे. लोकलच्या एका डब्यातून 1.3 टन मालाची वाहतूक करता येणार आहे. अॅमेझॉन कंपनीला आपले पार्सल भिवंडी हबमधून कल्याणला रस्त्यामार्गी आणून त्यानंतर रेल्वेचा वापर करावा लागणार आहे. ही मालवाहतूक कमी गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच करता येणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

हे वाचलेय का... मुंबई 'नाईट लाईफ'वर अमृता फडणवीस म्हणतात...

लोकलचा मधला मालडबा अॅमेझॉनसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वार सुरू आहे. यामुळे मध्य रेल्वेला महसूल मिळणार आहे. पार्सलची ने-आण करताना कोणत्याही प्रवाशाला कोणतेही नुकसान होणार नाही 
- शिवाजी सुतार,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

A wagon from the Central Railway to the Amazon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A wagon from the Central Railway to the Amazon