मोठी बातमी - BMC ताब्यात घेणार मुंबईतील वानखेडे स्टेडियम, वानखेडेत होणार 'या' कोरोना रुग्णांचे उपचार

मोठी बातमी - BMC ताब्यात घेणार मुंबईतील वानखेडे स्टेडियम, वानखेडेत होणार 'या' कोरोना रुग्णांचे उपचार

मुंबई - मुंबईतील वरळीमधील NSCI डोम, BKC मैदान, गोरेगावमधील एग्झिबिशन सेंटरनंतर आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा वापर कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी केला जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA ला एक पत्र पाठवण्यात आलंय. यामध्ये वानखेडे स्टेडियमचा वापर कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी केला जाणार असल्याचं नमूद केलंय. मुंबईच्या A वॉर्ड मधील सहाय्यक मनपा आयुक्त चंदा जाधव यांच्याकडून हे पत्र पाठवण्यात आलंय. 

वानखेडे स्टेडियमवर अशा रुग्णांना ठेवण्यात येणार आहे जे कोरोना रुग्णांच्या थेट संपर्कात आले आहेत आणि ज्यांना कोणतीही कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. गेल्या दोन दिवस सातत्याने मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा ९०० च्या वर जाताना पाहायला मिळतोय. गुरुवारी ९९८ तर काल म्हणजेच शुक्रवारी ९३३ नवीन कोरोना रुग्ण एकट्या मुंबईतून आढळले आहेत. वरळीतील NSCI डोमनंतर एखाद्या क्रीडा संकुलाचे वापर कोरोनासाठी करण्याची ही दुसरी वेळ आहे.  

MCA च्या अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे एप्रिल महिन्यातच MCA कडून मुंबई महापालिकेला वानखेडे स्टेडियमचा वापर कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी करण्याबाबत कळवण्यात आलं होतं. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हातभार लावणं गर्वाचं असल्याचंही MCA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान मुंबई महापालिकेकडून गुरुवार दिनांक १४ मे रोजी MCA ला या संदर्भात पत्र आलं आहे, मात्र वानखेडे स्टेडियमच्या कोणत्या भागांचा वापर कोरोना रुग्णांसाठी होणार असल्याची माहिती MCA कडे नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. 

wankhede stadium of churchgate will be use for covid quarantine facility

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com