हवे होते 200 कोटींचे कर्ज.. गमावले 20 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

बनावट वित्तसंस्थेच्या संचालकाला अटक

हवे होते 200 कोटींचे कर्ज.. गमावले 20 लाख

अंधेरी : दिल्लीतील व्यावसायिकाला 200 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून 20 लाखांचा गंडा घालणाऱ्या बनावट वित्तसंस्थेचा 54 वर्षीय संचालक अजय रामस्वरूप यादव याला अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. चित्रपट बनवण्यासाठी त्याने ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

घरच्या घरी `ब्लड शुगर` कंट्रोेल करण्याचे सोपे पर्याय...

दिल्लीतील साईनाथ स्पिरिट कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी 200 कोटी रुपयांची गरज होती. या कंपनीने अग्लो एंटरप्रायझेस या खासगी फायनान्स कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी यादव याने प्रक्रिया शुल्क म्हणून 20 लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार या कंपनीने आरटीजीएस प्रणालीद्वारे एका बॅंकेत जमा केलेले 20 लाख रुपये यादव याने तत्काळ काढून घेतले.

`गंगूबाई काठियावाडी` वास्तवापेक्षा वेगळाच? कोण म्हणतंय असं...

त्यानंतर कर्ज मिळवण्यासाठी या कंपनीमार्फत वारंवार यादव याच्याशी संपर्क साधला जात होता; परंतु यादव दाद देत नसल्यामुळे कंपनीच्या वतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यादव याला अटक केली असून, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्‍यता आहे. आपण चित्रपट व वेब मालिकांचे निर्माता असल्याचा आणि त्यानंतर पर्सनल फायनान्स व्यवसाय सुरू केल्याचा यादव याचा दावा आहे.

Wanted 200 crore loan .. lost 20 lakh