'जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील'; समीर वानखेडेना धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede

मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांना सोशल मीडियावर धमक्या देण्यात आल्या आहेत.

'जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील'; समीर वानखेडेना धमकी

मुंबई - मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांना सोशल मीडियावर धमक्या देण्यात आल्या आहेत. 'जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील', असा धमकी वजा संदेश त्यांना पाठवण्यात आला आहे. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांनी ही गोरेगाव पोलीस ठाण्यात पोलिसांना या सगळ्याची सविस्तरपणे माहिती दिली आणि सोशल मीडियावर त्यांना पाठवण्यात आलेला संदेशही पोलिसांना दिला. एका ट्विटर अकाऊंटवरून समीर वानखेडे यांना धमकी मिळाल्याची माहिती आहे.गोरेगाव पोलीस याप्रकरणात तपास करत आहेत. 14 ऑगस्ट रोजी समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर वानखेडेनी नवाब मलिक यांच्याविरोधात एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. नवाब मलिक यांनी मंत्री असताना समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. त्यावेळी चित्रपट स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या क्रुझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी समीर वानखेडे करत होते.

समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी रविवारी रात्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी आयपीसीच्या कलम 500 आणि 501 तसेच एससी - एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेने बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप होता. या आरोपाबाबत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती द्वारे चौकशी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने शुक्रवारी 13 ऑगस्टला आदेश जारी करून समीर वानखेडे अनुसूचित जातीच्या श्रेणीत येत असल्याचे सांगत समीर वानखेडे याना दिलासा दिला. वानखेडे हे जन्माने मुस्लिम नव्हते, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Warning Message To Sameer Wankhede Crime Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..