
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खलबतं सुरू झाली आहेत. शिवसेना शिंदे गटाची पक्षवाढीसाठी फोडाफोडी सुरू आहे. आपल्या नगरसेवकांना मात्र इतर कोठेही न जाण्याची तंबी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात असलेल्या कल्याण-डोंबिवलीमधील माजी नगरसेवकांना बुधवारी (ता. १३) रात्री शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्यावर तातडीने बोलावण्यात आले होते. या बैठकीला आमदार राजेश मोरे यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.