esakal | वासिंद : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्ता मिळेना! | Basic Facilities
sakal

बोलून बातमी शोधा

 Road

वासिंद : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्ता मिळेना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वासिंद : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली; मात्र अजूनही काही गावांमध्ये (village) प्राथमिक सुविधासुद्धा (Basic facilities) उपलब्ध झालेली नाही. शहापूर (shahapur) तालुक्यातील वांद्रे गावाजवळ असलेल्या दोडके पाड्याला अजूनही पक्का रस्ता (Road) मिळालेला नाही. येथील आदिवासी बांधवांना (tribal problems) चिखल, पाण्यातून ये-जा करावी लागत आहे.

हेही वाचा: नवी मुंबई: कोविड योद्ध्यांच्या योजनेला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

शहापूर तालुक्यातील वासिंद शहरापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिवळी, वांद्रे गावलगत दोडके पाडा ही २२ ते २५ घरांची आदिवासी लोकवस्ती आहे. या ठिकाणी ये-जा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पक्का रस्ता नाही. जवळच्या पायवाटेवर ओहळ आहे; मात्र त्यावर पूल नसल्याने मुख्य रस्त्यावर येण्यासाठी एक-दीड किलोमीटरचे अंतर असताना नागरिकांना वांद्रे गावातून चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारून प्रवास करावा लागत आहे. तसेच जवळच असलेल्या आळणपाडा या आदिवासी वस्तीसाठीही रस्ता नाही. त्यामुळे दोन्ही पाड्यांतील लोकांना रस्त्याअभावी चिखला पाण्यातून पायवाटेने ये-जा करावे लागत असल्याची खंत येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

"आमच्या पाड्यावर रहदारीचा पक्का रस्ता नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री एखादी घटना घडल्यावर आम्हाला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो."
- रमेश दोडके, दोडके पाडा, वांद्रे

"या गावाची रस्ता व पुलाची समस्या सुटावी यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा सुरू आहे."
- राजदीप जामदार, विभागप्रमुख, शिवसेना

loading image
go to top