
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही.
मुंबईः मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी 'निरंक' असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिलस्थित 'वर्षा' आणि त्याच्याशी संलग्न 'तोरणा'या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.
राज्यांच्या जवळ जवळ संपूर्ण मंत्रिमंडळाच्या शासकीय निवासस्थानांची पाणीपट्टी थकल्याने महानगर पालिकेने हे बंगले डिफॉल्टर यादीत टाकले आहेत. यात विरोधीपक्षनेते, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या शासकीय निवासस्थानांचाही समावेश असून तब्बल 24 लाख 56 हजारांची थकाबाकी आहे.
मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
वर्षापेक्षा जास्त काळापासून पाणीपट्टी न भरणाऱ्या ग्राहकांना पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकते. डी प्रभागात तब्बल 4 हजारहून अधिक डिफॉल्टर आहेत. यात बिल्डर, व्यापारी काही सार्वजनिक बँकाचाही समावेश आहे. ग्रान्टरोड, ताडदेव, मलबार हिल हा परिसर या प्रभागात येतो. शकील अहमद यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत ही माहिती मिळवली आहे.
मंत्रिमंडळाची थकबाकी
कोविड लॉकडाऊनमुळे महानगर पालिकेचे उत्पन्न घटलेले असल्याने पालिकेने यंदा कर वसुलीसाठीच आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र डी प्रभागातील डिफॉल्टर यादीतून बहुसंख्या व्यापारी, शासकीय आणि बिल्डरांचीच थकबाकी असल्याचे लक्षात येते.
हेही वाचा- 2016 ऋतिक-कंगना वादः गुन्हे शाखेचे गुप्तवार्ता कक्ष करणार तपास
----------------------
(संपादन- पूजा विचारे)
Water bill not pending cm uddhav thackeray varsha residences bmc report