2016 ऋतिक-कंगना वादः गुन्हे शाखेचे गुप्तवार्ता कक्ष करणार तपास

2016 ऋतिक-कंगना वादः गुन्हे शाखेचे गुप्तवार्ता कक्ष करणार तपास

मुंबईः अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वादाप्रकरणी 2016 मध्ये सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आलेला गुन्हा गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता कक्षाकडे(सीआययू) वर्ग करण्यात आला आहे. ऋतिकचा घटस्फोट झाल्यावर(डिसेंबर,2013 मध्ये) त्याने पॅरिसमध्ये तिला प्रपोज केले होते, असे कंगनाने सांगितले होते. त्यासाठी ऋतिकच्यावतीने पासपोर्टची माहिती सादर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कंगनाने 2014 मध्ये 1400 ऋतिकला पाठवले, जे सायबर गुन्ह्यांशी संबंधित आहे. मंगळवारी तपास करणाऱ्यांपुढे सादर केलेल्या नवीन पुराव्या देखील या ईमेलशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

2016 च्या सुरुवातीला, एका मुलाखतीत ऋतिकबद्दल बोलताना तिने हृतिकचा उल्लेख ‘पूर्वाश्रमीचा मुर्ख प्रियकर’ असा केला होता. तिच्या या वक्तव्यामुळे ऋतिकने, कंगनाला कायदेशीर नोटीस बजावली होती. कंगनाने माझी माफी मागावी असा संदेश त्याने या नोटीसमधून पाठवला होता. 2016 ची सुरुवात या वादाने झाली तर वर्षाचा शेवटही याच वादाने झाला. हृतिकने त्याच्यासोबतचा कंगनाचा एक फोटो व्हायरल केला होता. तसेच दोघांमधील ऑनलाईन संभाषण वायरल केले होते. त्यावर हृतिक रोशनने आपल्या नावाने बनावट ईमेला पाठवलायाच दावा केला होता. 

त्याप्रकरणी हृतिकच्या तक्रारीनंतर भादंवि कलम 419 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिस याप्रकरणी तपास करत होते. पण आता याबाबत सीआययू तपास करणार आहे. याप्रकरणी ऋतिकचे वकिल महेश जेठमलानी यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून याप्रकरणी कोणतीही प्रगती नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

2016 Hrithik Kangana controversy Crime Branch intelligence cell will investigate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com