
मोखाडा - पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. तालुक्यातील चास ग्रामपंचायतीमधील हट्टीपाडा येथे डिसेंबरच्या पंधरवाड्यात विहीरींनी तळ गाठल्याने, पहिली पाणी टंचाईची ठिणगी पडली आहे. त्यापाठोपाठ किनिस्ते ग्रामपंचायती मधील गवरचरीपाडा येथे टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.