
नवी मुंबई : भरपावसाळ्यात खारघरमध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांकडून सिडकोविरोधात संताप व्यक्त होत आहे. महिनाभरापासून खारघरमध्ये अनेक सोसायट्यांना टँकरवर तहान भागवावी लागत आहे. सेक्टर ३५, ३६ ओवे गाव आदी भागांना महिन्यातून किमान चार वेळा तरी अपुरा पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागते. सिडकोतर्फे वारंवार जलवाहिन्यांवर घेण्यात येणारी दुरुस्तीची कामे अपुऱ्या पाणीपुरवठ्यास कारणीभूत ठरत आहेत.