esakal | कल्याणमध्ये विद्युत बिघाडामुळे पाणीसमस्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कल्याणमध्ये विद्युत बिघाडामुळे पाणीसमस्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) महापालिकेच्या बारावे पंपगृह (Twelfth pump house) येथील विद्युत (Electricity) बिघाडामुळे कल्याण (Kalyan) पूर्व-पश्चिम (West-East) अनेक भागांत १२ तासांहून अधिक काळ ३५ हजारांहून अधिक ग्राहकांना पाणीसमस्येचा (Water problrm) सामना करावा लागला. पहाटे तीन वाजता पाणीपुरवठा सुरळीत झाला; मात्र अनेक भागांत कमी दाबाने पुरवठा झाला, तर अनेक ठिकाणी आवश्यकतेनुसार टँकरने (Tanker) नागरिकांना पाणी पोहोचवण्यात आले.

बारावे पंपगृह येथे बुधवारी दुपारी विद्युत बिघाड झाल्याने कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमच्या काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणीसमस्येला सामोरे जावे लागले. कल्याण पश्चिमेला पालिका क प्रभाग क्षेत्रातील बैल बाजार, गांधी चौक, शंकरराव चौक, गोविंदवाडी, रेतीबंदर क्षेत्रात १०० टक्के पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. ब प्रभाग क्षेत्रात ५० टक्के ठिकाणी पाणीसमस्या निर्माण झाली. कल्याण पूर्वमधील ड आणि जे प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या ९० टक्के परिसरातील सुमारे ३५ हजारांहून अधिक ग्राहकांना पाणीसमस्येला सामोरे जावे लागले.

बिघाड होताच पालिका पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे आणि त्यांच्या अभियंता यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. १२ ते १५ तासांनंतर आज पहाटे तीनच्या सुमारास काम पूर्ण होताच, अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. यामुळे आजही नागरिकांना पाणीसमस्येला सामोरे जावे लागले.

हेही वाचा: पोलिस भरतीच्या उमेदवारांपुढे तांत्रिक अडचण

तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेच्या ३५ हजारांहून अधिक ग्राहकांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. पहाटे तीनच्या सुमारास पाणीपुरवठा पूर्ववत झाला असून काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून सायंकाळपर्यंत पुरवठा पूर्ववत होईल. जेथे मागणी होती तेथे टँकरने पाणीपुरवठा केला असून नागरिकांनी सहकार्य करावे.

- प्रमोद मोरे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

loading image
go to top