मुंबई
Mumbai Water Supply: मुंबईत आज पाणीबाणी! तानसा मुख्य जलवाहिनीला गळती; कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद? जाणून घ्या
Water shortage in Mumbai Today: पाणीगळतीवर जल अभियंता खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नियंत्रण मिळविले असले तरी या गळतीमुळे सांताक्रूझ पूर्व, अंधेरी पूर्व, दादर, भांडुप या भागात शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई- तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीला पवई येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोठी गळती लागली. या पाणीगळतीवर जल अभियंता खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नियंत्रण मिळविले असले तरी या गळतीमुळे सांताक्रूझ पूर्व, अंधेरी पूर्व, दादर, भांडुप या भागात शनिवारी (ता. २४) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पवई येथे आरे वसाहतीजवळच्या गौतम नगर परिसरात १,८०० मिलिमीटर व्यासाच्या तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीला शुक्रवारी मोठी गळती लागल्याचे आढळून आले. त्याची माहिती मिळताच सहायक अभियंता नगर बाह्य ( प्रमुख जलवाहिन्या )विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी तत्काळ तेथे जाऊन जलवाहिनीवरील झडप (व्हॉल्व्ह ) बंद करून पाणीगळती बंद केली.