Shahapur in Water Shortage: शहापूर तालुक्यात पाणीटंचाई ; २८ गावपाड्यांना जि.प.कडून टँकरने पाणीपुरवठा
Mumbai News : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याला फेब्रुवारीच्या अखेरीस पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जून-जुलैपर्यंत पाणीटंचाईची कळ सोसावी लागते.
Water tankers providing relief to 28 villages in Shahapur Taluka, as the region faces severe water scarcity.Sakal
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील धरणांमुळे ओळख असलेल्या शहापूर तालुक्याला सध्या पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत शहापूर तालुक्यातील सात गावे आणि २१ पाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.