खारघर : दोन दिवसांनी दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. मात्र ऐन दिवाळी उत्सवात तळोजा आणि खारघर परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे रहिवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे..तळोजा आणि खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडे पत्र व्यवहार केला जात आहे. तसेच पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध व्हावे यासाठी अधिकाऱ्याची भेट घेतली जात आहे. मात्र आश्वासना पलीकडे कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली जात नाही..Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?.तळोजा मधील रहिवासीयांनी मुंबई आझाद मैदानात मोर्चा आंदोलने केले तसेच खारघर मधील भाजपा कार्यकर्त्यांनी सिडको मुख्यालयात जमिनीवर ठाण मांडून बसले होते. एवढेच नव्हे तर तीन दिवसापूर्वी मनसे च्या कार्यकर्त्यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागात पाणी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले होते. मात्र परिस्थिती जैसे थे आहे..विशेष म्हणजे शुक्रवार पासून दिवाळीला सुरवात होणार आहे. त्यामुळे घरोघरी फराळ तयार साठी महिलांची लगबग सुरु आहे. मात्र भांडी कुंडी धुण्यासाठी पुरेसा पाणी उपलब्ध नसल्याने महिला वर्गात नाराजी पसरली आहे.सिडको कडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेक रहिवासियांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.सिडकोने दिवाळी उत्सवात पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रहिवासीयाकडून केली जात आहे..EOW आणि ED च्या कारवाईत काय फरक आहे?.तळोजा एम आय डीसीकडून शट डाऊन घेतल्यामुळे तळोजा वसाहतीत पाणी टंचाई निर्माण झाली होती.त्यानंतर पूर्वी प्रमाणे पाणी उपलब्ध करून दिला जात आहे.तसेच ज्या सोसायटीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. अशा सोसायटीत सिडको कडून टँकर उपलब्ध करून दिला जात आहे.--व्ही बी गायकवाड, कार्यकारी अभियंता.पाणी पुरवठा विभाग सिडकोतळोजा आणि खारघर मध्ये नागरिकांना सिडकोने घरे उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सिडकोची आहे. सिडकोने दिवाळी उत्सवात पुरेसा पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.- देवेंद्र मढवी, रहिवासी तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल .खाजगी टँकरची गरजतळोजा वसाहतीत गेल्या काही दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे वसाहत मधील प्रत्येक रस्त्यावर पाण्याचे टँकर ये-जा करीत असल्याचे दिसून येते. सिडकोकडून वेळेवर टँकर उपलब्ध होत नसल्यामुळे अडीच ते तीन हजार रुपये खर्च करून खाजगी टँकर मागवून गरजा पूर्ण कराव्या लागत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.