
Water Supply Scheme
कासा : शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना डहाणू तालुक्यात रखडल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल सोसावे लागत आहेत.