Thane Water Cut: ठाण्यात पुन्हा पाण्याचा ठणठणाट! सोमवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या भागांना फटका?

Thane Water Supply: ठाणे शहरात सोमवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
Thane water supply

Thane water supply

sakal
Updated on: 

ठाणे : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाची झळ आता ठाणेकरांना बसू लागली आहे. उपलब्ध जलसाठा जपण्यासाठी राज्य सरकारने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार ठाणे महापालिकेने दर सोमवारी २४ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी (ता. १६) सकाळी ९ ते मंगळवारी (ता. १७) सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील १८ भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचे नियोजन करूनच दिवस काढावा लागणार आहे.

Loading content, please wait...