Water Supply Cut in Mumbai And Thane
मुंबई : मुलुंड आणि भांडुप परिसरातील वैतरणा मुख्य जलवाहिनीवर दुरुस्तीचे आणि जलजोडण्या स्थलांतरित करण्याचे महत्त्वाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या कामामुळे मंगळवारी (ता. २७) सकाळी १० ते बुधवारी (ता. २८) सकाळी १०पर्यंत २४ तास मुंबईतील ‘एस’ आणि ‘टी’ विभागांसह ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.