Loksabha 2019 : 'भाड मे गया कानून और आचारसंहिता' - संजय राऊत

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

शिवसेना खारदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई - शिवसेना खारदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामनवमी मिनित्त प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात संजय राऊत 'भाड मे गया कानून और आचारसंहिता' असे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, कायदा आणि निवडणूक आयोग आम्हाला लागू होत नाही. असे त्यांनी म्हटले आहे. कायदा आम्ही हवा तेव्हा बदलू असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते अडचणित येणार आहेत.

तसेच मनातलं आम्ही बोलून दाखवलं नाही तर गुदमरल्यासारखं होतं असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.  

Web Title: we do not follow code of conductsays sanjay raut