'जेएनपीटी' कामगारांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू - श्रीरंग बारणे

'जेएनपीटी' कामगारांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू -  श्रीरंग बारणे

उरण - जेएनपीटी बंदर हे शेतकऱ्याच्या त्यागातून व हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे. आपल्या सर्वस्वाची होळी करणाऱ्या प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या जैसे थे ठेऊन जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करून जेएनपीटी कर्मचाऱ्यांना संकटात टाकणाऱ्या केंद्रसरकार विरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे.
       केंद्र सरकारने  जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णय विरोधात आज जेएनपीटी कामगारांनी आपल्या कुटुंबासह जेएनपीटी प्रशासन भवनावर प्रचंड मोर्चा काढला होता.पोलिसांनी हा मोर्चा कासव चौकात अडविल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले.जेएनपीटी कामगार एकता संघटना, न्हावा शेवा बंदर कामगार संघटना आणि जेएनपीटी वर्कर्स युनियन या संघटनांच्या माध्यमातून आयोजित या मोर्चात शेकडो कामगार सहभागी झाले होते.या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगड चे खासदार सुनिल तटकरे आवर्जून उपस्थित होते.यावेळी खासदार बारणे यांनी आपली भूमिका विशद केली.

देशातील सर्व बंदराच्या उत्पन्नापैकी केंद्र सरकारला 35 टक्के उत्पन्न एका जेएनपीटी बंदरातून मिळत असताना काही भांडवलदारांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार जेएनपीटी बंदराचे खाजगीकरणकरण करीत असेल तर ते शिवसेना कधीही सहन करणार नसल्याचे खासदार बारणे यांनी स्पष्ट केले.या खाजगीकरण प्रश्नाबाबत केंद्रीय बंदर विकास मंत्री मनसुख मालवीय यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केल्यावर जेएनपीटी बंदराच्या खाजगिकरणाचा कसलाही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले होते.मात्र देशाच्या चौकीदाराने आक्ख बंदरच विकायला काढल्याने शिवसेना त्याला प्रखर विरोध करेल असे सांगून प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा खासदार बारणे यांनी यावेळी दिला.
     यावेळी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी केंद्र सरकारने शिवरायाच्या भूमीतील भूमीपुत्रांशी वाकडे घेऊ नका असे सांगून आता राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने कुठल्याही कामगारांविरोधी निर्णय घेऊ देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन दादा पाटील,माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश राहालकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, इंटकचे राष्ट्रीय नेते  महेंद्र घरत, उरण उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील,एल बी पाटील, विजय पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली.यावेळी कामगार नेते दिनेश पाटील,भूषण पाटील,रवी पाटील, रमेश म्हात्रे,संतोष ठाकूर,उरणचे सभापती सागर कडू,उपसभापती शुभांगी पाटील,जी प सदस्य बाजीराव परदेशी, पं स सदस्य नरेश घरत,भावना घाणेकर मनोज भगत,संजय ठाकूर,गणेश घरत सुरेश ठाकूर आदी मान्यवर व शेकडो कामगार उपस्थित होते.

We will agitate against the central government for JNPT workers Shrirang Barne

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com