
Mumbai Local train : धुक्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विलंबाने!
मुंबई : बाहेर राज्यातून मुंबईत येणाऱ्या लांबपल्याचा मेल-एक्सप्रेस गाड्यांना धुक्यामुळे मोठा फटका बसला आहे. या गाड्यांना जलद मार्गिका उपलब्ध करून दिल्याने बुधवारी जलद मार्गावरील उपनगरीय लोकल सेवांचा वेळापत्रकाला मोठा फटका बसला आहे. अँप जलद लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे चांगले हाल झाले आहे.
गेल्या काही दिवसंपासून थंडीचे प्रमाण वाढले असून दाट धुक्यामुळे रेल्वेची वाहतूकीला सतत फटका बसत आहे. बुधवारी सुद्धा दक्षिण आणि उत्तर भारतातील राज्यातून मुंबईत येणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांचा वेळापत्रकावर मोठा परिणाम पडला आहे.
अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या धुक्यामुळे आपल्या निर्धारित वेळापेक्षा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळविण्यात आल्याने अँप जलद मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. परिणामी सकाळी १० ते १५ मिनिटे लोकल उशीराने धावत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.