Heatwave Alert : मुंबईसह महाराष्ट्रातील 'या' सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून खबरदारीचे आवाहन

Weather Update Heatwave Alert Mumbai: राज्यातील तापमानात चिंताजनक वाढ झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच अतिशय कडक ऊन जाणवत आहे. पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार आहे.
Mumbai Weather News
Heatwave Alert Mumbaiesakal
Updated on
Summary

'राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला असून, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात दिवसाच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे.’

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) मुंबईसह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांसाठी २६ फेब्रुवारीला उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतरही तापमान चढेच राहण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे तसेच दुपारी घरून निघताना पाणी सोबत ठेवण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com