शाब्बास धारावी! प्लाझ्मा दानाला धारावीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कोरोनामुक्तीसाठी पुढाकार

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा 
Monday, 27 July 2020

कोरोनातून धारावीकरांनी कोरोनातून स्वतःची सुटका ही करून घेतली. आता तीच कोरोनामुक्त धारावी प्लाझ्मा दानासाठी सरसावली आहे.

मुंबई - मे महिन्याच्या मध्यावर कोरोना संसर्गात ज्या धारावीने राज्याला धडकी भरवली होती. तेवढ्याच कमी कालावधीत कोरोनातून धारावीकरांनी कोरोनातून स्वतःची सुटका ही करून घेतली. आता तीच कोरोनामुक्त धारावी प्लाझ्मा दानासाठी सरसावली आहे.

मुंबईकरांना दिलासा; शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये ऑक्सीजनची पातळी सामान्य...

धारावी, अणुशक्ती नगर, चेंबूर याठिकाणी गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांना, प्लाझ्मा दात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. धारावीमध्ये सुमारे 120 तर अणुशक्तीनगर- चेंबूर येथे सुमारे 60 दात्यांची प्राथमिक चाचणी करण्यात आली. यामध्ये कोरोनामुक्त झालेले डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, धारावी आणि चेंबूर- अणुशक्तीनगर मधील सामान्य जनता यांचा समावेश असून, धारावी आणि अणुशक्तीनगर- चेंबूर येथील शिबिरांमध्ये मिळून सुमारे 50 प्लाझ्मा दाते प्राथमिक चाचणीत पात्र ठरले असून अद्याप यातील सुमारे 10 जणांचा प्लाझ्मा घेण्यात आला आहे. उर्वरित दात्यांचा प्लाझ्मा येत्या काही दिवसांत घेतला जाणार आहे. या दात्यांपैकी 9 जणांचा प्रातिनिधिक सत्कार महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या हस्ते करण्यात आला. 

मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळख असणाऱ्या डबेवाल्यांनी सुरु केली 'ही' नवी सेवा...

प्लाझ्मा दात्यांचा आयुक्तांकडून सन्मान :

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त, खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या 'प्लाझ्मा दान संकल्प अभियाना'त सहभागी झालेल्या 9 दात्यांना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, नगरसेवक वसंत नकाशे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

प्लाझ्मा दान या पालिकेच्या आणि खुद्द मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला कोरोनातून बऱ्या झालेल्या 400 रुग्णांनी प्रतिसाद देत प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही बऱ्या झालेल्या रुग्णांना संपर्क करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

खाकी संसर्गाच्या विळख्यात! राज्यात 48 तासांत 352 पोलिसांना कोरोनाची लागण...

धारावीतील कामराज स्कूल, 90 फिट रोड येथे रक्त तपासणी सुरू झाली आहे. ज्यांना रक्तदाब, मधुमेह आणि इतर कोणते गंभीर आजार नाहीत आणि ज्यांचा प्लाझ्मा जुळेल अशांची निवड केली जाईल. त्यानंतर त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी सायन, केईएम आणि नायर रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. 

----------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Well done Dharavi! Spontaneous response of plasma donors; Initiatives for Coronation

टॉपिकस