शाब्बास मुंबईकर! कोरोना रोखण्यासाठी मुंबकरांची अशीही कामगिरी...

शाब्बास मुंबईकर! कोरोना रोखण्यासाठी मुंबकरांची अशीही कामगिरी...

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे.मुंबईत कोरोनाचे दिवसेंदिवस नवीन रुग्णांचा आकडा समोर येतो. त्यामुळे आणखीनच चिंता वाढली आहे. बाहेर फिरताना मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आल आहे. मात्र तरी सुद्धा काही बेजबाबदार नागरिक मास्क घालत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईत मास्क न घातल्या प्रकरणाची एकही नोंद झालेली नसल्याचं आढळून आलं आहे. 

अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणे तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तोंडाला मास्क लावूनच बाहेर फिरणं प्रशासनानं अनिवार्य केलं आहे. अशातच मास्क न वापरणाऱ्या लोकांवर आतापर्यंत 1240 जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तसंच शिवाय पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी जमणं, कलम 188 चे उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 हजार 877 जणांवर गुन्हे नोंदवलेले आहेत. 

नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडावं, पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकञ जमू नये, तसेच तोंडाला मास्क वापरणे सक्तीचे केले असताना, अनेकदा बेशिस्त नागरिक या नियमांची पायमल्ली करताना आढळतात. अन्य दिवशी दिवसाला 10 हून अधिक गुन्हे मास्क न घालणाऱ्या विरोधात नोंदवण्यात आलेत. मात्र पोलिसांनी वेळोवेळी उचललेल्या पाऊलांमुळे आता त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. म्हणूनच सोमवारी मास्क न घातल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एक ही गुन्हा नोंदवल्याचे त्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. 

सध्या मुंबईत लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अवैध वाहतूकीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 80 हजार 532 जणांची वाहने जप्त केली आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात 1 लाख 23 हजार गुन्हे आतापर्यंत पोलिसांनी नोंदवलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com