पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू; आरोपी चालक फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Mumbai Accident : पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू; आरोपी चालक फरार

मुंबई - मुंबईतील वाकोला परिसरात शुक्रवारी पहाटे पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या चालकाला एका लक्झरी बसने धडक दिल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. अख्तर चौधरी असे मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. धडक दिल्यावर आरोपी बस चालकाने पळ काढलं. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

वाहनात काही बिघाड झाल्याने चालक अख्तर चौधरीना आपला टेम्पो महामार्गाच्या बाजूला थांबवावा लागला. मात्र, मागून येणाऱ्या लक्झरी बसने त्याला पाठीमागून धडक दिली, ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.टेम्पोमध्ये मासळीचा असल्याची माहिती मिळत आहे.

अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून बसचालकाचा पोलीसांनी शोध सुरू केला आहे. या अपघातात बसमधील एकाही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे.