सुपरस्टार शाहरुख खानच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी; आरोपी ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Shahrukh Khan : सुपरस्टार शाहरुख खानच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी; आरोपी ताब्यात

मुंबई - अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची भिंत पार करून बेकायदेशररित्या खाजगी ठिकाणी घुसखोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी गुजरातमधील दोन तरुणांना ताब्यात घेतले. वांद्रे पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि 452, 34 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दोघेही गुजरातमधील सुरतचे रहिवासी असून शाहरुख खानचे चाहते असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील वांद्रे येथील मन्नत या बंगल्यावर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षात सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकत सुरतमध्ये राहणारे दोन तरुण बंगल्याच्या भिंतीला पार करून आत घुसले.

एवढेच नाही तर दोघेही बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. त्यामुळे सुरक्षारक्षकांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांचे वय 19 ते 21 वर्षे आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगीशिवाय बंगल्यात प्रवेश करणे यासह भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांखाली पुढील तपास सुरू असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.