दहिसर जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये अजगर सापडल्याने खळबळ

python
pythonsakal media

दहिसर : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील (western Mumbai) दहिसर जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये (dahisar corona center) काल मध्यरात्री अजगर सापडल्याने (python) एकच खळबळ माजली. सुरक्षा रक्षकांना याबाबतची माहिती मिळताच नजीकच्या केतकी पाड्यात (ketaki pada) राहणारे सर्पमित्र सुरज रवींद्र यादव (snake handler suraj yadav) व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अजगराला सुखरूप पकडले.

त्यानंतर आज सकाळी अजगराची जंगलात सुखरुप सुटका करण्यात आली. मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने दहिसर चेक नाका येथे जम्बो कोव्हीड सेंटरची निर्मिती केली आहे. मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर या ठिकाणी असलेल्या रुग्णांचे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू मुंबईतील रुग्ण संख्या कमी होत असल्याने या ठिकाणी सध्या एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नाही. मात्र या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू असल्याने पहाटेपासूनच लोकांची मोठी गर्दी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com