अखेर पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबणार; रेल्वेकडून वादग्रस्त आदेश रद्द..

प्रशांत कांबळे 
Friday, 10 July 2020

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परेल वर्कशाॅप मध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची कोविड-19 च्या संदर्भातील माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले होते.

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परेल वर्कशाॅप मध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची कोविड-19 च्या संदर्भातील माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले होते.

यामध्ये एकाही कर्मचाऱ्यांने खोटी माहिती भरल्यास त्यांच्या वर फॅक्टरी अॅक्ट, राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला होता. मात्र, या आदेशाला वेस्टर्न रेल्वे मजदुर युनियनने विरोध केल्यानंतर अखेर हा आदेश रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा: संजय राऊतांचा शरद पवारांना 'तो' रोखठोक सवाल, दुसरा प्रोमो रिलीज

कोविड-19 च्या काळात आधीच राज्य आणि केंद्र सरकारने सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्क लावणे, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीमध्ये हळुहळू राज्यासह केंद्राचे कार्यालय, वर्कशाॅप सुद्धा सुरू करण्यात आले आहे. नुकतेच मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीने लोअर परेल वर्कशाॅप सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 30 टक्के रेल्वे कर्मचारी म्हणजेच सुमारे 3500 कर्मचारी काम दैनंदिन काम करत आहे. 

मात्र, मुंबई उपनगरातील विविध ठिकाणाहून कर्तव्यावर आपल्या जिव मुठीत धरून कामावर येत असतांना, नुकतेच पश्चिम रेल्वेने या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर रुजू होतांना एक फाॅर्म भरण्याचे आदेश देण्यात आले होते. 

हेही वाचा: कोरोनाच्या संकटात पालिकेला मदत करा, CMनी कोणाकडे मागितली मदत

त्यामध्ये कर्मचारी कोणत्या परिसरात राहतो, कोविड-19 तपासणी झाली आहे का ?, कंन्टेन्मेन्ट झोन मधून प्रवास केला का ? अशा प्रकारची माहिती भरायला लागत होती. मात्र, याला वेस्टर्न रेल्वे मजदुर संघाने प्रचंड विरोध केल्यानतंर आता, हा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

western railway cancelled all Controversial orders


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: western railway cancelled all Controversial orders