

Railway Accidents now will avoided
ESakal
मुंबई : रेल्वे रुळांवर भटकी जनावरे व इतर अडथळ्यांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने विरार ते अहमदाबाददरम्यान मोठ्या प्रमाणावर संरक्षक कुंपण उभारले आहे. एकूण ३३७ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पावर सुमारे ११९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. यामुळे रेल्वे सुरक्षेबरोबरच गाड्यांच्या वक्तशीरपणातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.