Western Railway: प्रवाशांचा होणार आरामदायी प्रवास! मुंबईहून इंदोरला धावणार तेजस स्पेशल ट्रेन; कसे असेल वेळापत्रक?
Tejas Special Train: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि इंदूर दरम्यान खास सुपरफास्ट तेजस स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि इंदोर दरम्यान खास सुपरफास्ट तेजस स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा २३ जुलैपासून सुरु होणार असून २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत ३४ फेऱ्यांमध्ये ही ट्रेन धावणार आहे.