- निखिल मेस्त्री
पालघर - पश्चिम रेल्वे वरील बोईसर व वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वाहिनी खंडित झाल्यामुळे गुजरात व मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. गुजरात मार्गावर ही समस्या उद्भवल्याने अनेक रेल्वेसेवा पालघर, केळवे, सफाळे आणि विरार येथे थांबवण्यात आल्या. तर गुजरात आणि डहाणूहून मुंबईकडे जाणारी सेवाही काही वेळ थांबवली गेली.